खाजगी सावकार मुळावर अणि शेतकरी उघड्यावर
कधी होणार सावकार मुक्त शेतकरी
निलेश चाळक बीड मो,9767894619
आज ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी खाजगी सावकाराचे पेव फुटलेले आहेत ,व हे खाजगी सावकार पाच ते दहा रूपये टक्कयांनी व्याजाने पैसे देत आहेत व ज्या शेतकर्याला किवा सर्वाधारण व्यक्तीला व्याजाने पैसे देवायचे आहेत त्या शेतकर्यांकडून किवा सर्वाधारण व्यक्ती कडून पैसे घेण्यापुर्वी त्या शेतकर्यांच्या किवा सर्वाधारण व्यक्तीच्या सह्या कोर्या कागदावर घेतात व नाहीतर त्याचे घर किवा शेती नावावर करून घेतात व हे पैसे अव्वाच्या सव्वा व्याजाने दिले जातात व तसेच ती घेतलेली रक्कम ठराविक वेळेत परत न केल्यास वेळो वेळी धमकी व माणसिक त्रास, आरेरावी केली जाते त्यामुळे बरेच शेतकरी व सर्वसामान्य व्यक्ती आत्महत्ये सारखा मार्ग स्विकारत आाहेत व सहा महीण्यापुर्वी बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील बाजार पेठेत व्याजाचे पैसे देत नसल्याच्या कारणावरून शेतकरी आई व मुलाला आमाणूष मारहान करण्यात आली होती तर एका सावकारने चक्क पैशाच्या बदल्यात एका शेतकर्यांकडे मुलगी आणि सुनेची मागणी केली होती तर औसा तालुक्यातील भादा या गावच्या महेश क्षीरसागर या शेतकरी युवकाने खाजगी सावकाराकडून घेतलेल्या 70 हजार रुपयांच्या कर्जापोटी साडेसात लाख रुपयांची फेड केली होती तरीही कर्ज फिटलेले नाही, अद्याप तीन लाख रुपये कर्जाची फेड व्हायची आहे, असा सावकाराचा तगादा होता. सावकाराच्या जुलूमशाहीला कंटाळून क्षीरसागरनेही मृत्यूला कवटाळले . व तसेच अनेक शेतकर्यांनी खाजगी सावकाराच्या जाचांला कटांळून आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे खाजगी सावकार मुळावर अन् शेतकरी उघड्यावर अशी गत झाली आहे अनेक आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचा ससांर उघड्यावर पडला आहे त्यामुळे कधी होणार सावकार मुक्त शेतकरी असा सवाल उपस्थित होत आहे तर आँगस्ट महीन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भाट-शिरपुरा या गावातील वनमाला चंद्रकांत गायकवाड या शेतकरी महिलेने विष पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने, स्वातंत्र्यानंतरच्या 69 वर्षानंतरही ‘सावकारी’ फासाच्या बळींचे सत्र सुरुच असल्याचे दिसून आले . नापिकी, दुष्काळ आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वनमाला गायकवाड यांनी गाव आणि परिसरातील 18 खाजगी सावकारांकडून कर्जे काढली होती. या कर्जाची परतफेड या अभागी महिलेने जमेल तशी केली. पण, मुद्दल आणि त्या कर्जावरचे चौपट, दहापट व्याज मात्र कायम असल्याने, कर्ज फेडीचे तगादे हे नराधम सावकार सातत्याने करीत होते. उदर निर्वाहाचे प्रमुख साधन असलेली कुटुंबाची परंपरागत जमीनही याच निर्दयी सावकाराने या आधीच हडप करून, वनमाला गायकवाड यांना पूर्णपणे निराधार केले होते. तरीही कर्ज आणि व्याजाच्या वसुलीसाठी या सावकारांचा तगादा सुरू होता. रस्त्यात अडवून आणि तिच्या घरी वारंवार जाऊन हे सावकार आणि त्यांचे गुंड तिला धमक्या देत होते .व तसेच घरासमोर तमाशाही करीत होते .बीड जिल्ह्यातील देवी बाभुळगाव येथल्या रामदास धोंडिबा जोगदंड या शेतकर्यांने सावकाराच्या विरोधात तक्रार केल्यामुळे त्याला विष पाजायचा अमानुष प्रकार चार महिन्यापूर्वी घडला होता.व तसेच शेतकर्याला कोणतेही आणि कुणाचेही कर्ज कधीच बुडवायचे नसते. शेतकर्यांनी मुद्दामहून कुणाचे कर्ज बुडवलेले नाही,व बुडवणारही नाहीत. पण, असहाय्य झालेले शेतकरी नाईलाजाने खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवतात आणि आपल्या प्राणप्रिय जमिनी सावकाराकडे गहाणवट ठेवून दरमहा शेकडा पाच ते दहा म्हणजेच वर्षाला शेकडा 60 ते 120 टक्क्यांच्या व्याजाने कर्ज घेतात. हे कर्ज देताना धूर्त आणि नीच सावकार महिन्याचे व्याज आधीच काढून घेतात. व्याजावर पुन्हा चक्रवाढीने व्याजाची आकारणी करतात. मूळ मुद्दलाच्या सातपट/आठपट परतफेड करूनही सावकारांचे कर्ज काही संपत नाही. खाजगी सावकारीच्या फासातून अन्नदात्या बळीराजाची सुटका काही अद्यापही झालेली नाही. काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीत तेव्हा गृह आणि उपमुख्यमंत्री असलेल्या आर. आर. पाटील यांनी शेतकर्यांचा छळ करणार्या सावकारांना ढोपरापासून सोलून काढायची भाषा विधिमंडळातच केली होती. पण आतापर्यंत एकाही सावकाराला असा कायद्याचा हिसका दाखवला गेलेला नाही. खाजगी सावकारीवर नियंत्रण करणारे अनेक कायदे सरकारने केले असले तरी त्याची दहशत शेतकर्यांना भीकेला लावून त्यांची लुबाडणूक-लुटालूट करायला सोकावलेल्या राज्यातील मुर्दाड आणि निगरगट्ट सावकारावर कठोर कारवाई झालेली नाही.त्यामुळे राज्य शासनाने अशा सावकारवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा